Thursday, August 2, 2012

आजच्या लोकसत्ता मध्ये (२ ऑगस्ट २०१२) आलेलं एका वाचकाचं पत्र :

याला म्हणतात देशाभिमान!
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या संबंधित एक बातमी नुकतीच (२३ जुलै) वाचनात आली.. पाकिस्तान मंत्रालयाने टाटा मोटार समूहाकडून ३८० सुमो ग्रँड गाडय़ा खरेदी करण्याची मागणी केली. पण या उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी ही मागणी फेटाळून लावली. ज्या खडय़ा शब्दांत त्यांनी त्याचे कारण सांगितले ते महत्त्वाचे आहे. ‘ज्या देशाची आतंकवाद
ाला जोपासण्यात, पसरवण्यात व त्याला खुलेआम खतपाणी घालण्यात थेट भूमिका आहे, त्या देशाशी कोणत्याही परिस्थितीत कोणताही व्यापार केला जाऊ शकत नाही.’
पाकिस्तानकडून भारतावर इतक्या वेळा अतिरेकी हल्ले झाले, त्याचे कित्येक पुरावे त्यांना सादर केले. तारीख पे तारीखप्रमाणे दोन देशांतील परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटी नि मेजवान्या होत असतात, पण निष्पन्न काही होत नाही. उलट आपल्या नेत्यांमध्ये, कलाकारांमध्ये नि खेळाडूंमध्ये पाकिस्तान प्रेम उफाळून येत असते. चीड आणणारी गोष्ट म्हणजे पैशासाठी हपापलेल्या बॉलीवूड कलाकारांना देशाची काहीही काळजी न पडता त्यांच्याकडून पाकिस्तानी कलाकारांना आपल्या वाहिन्यांवर रिअ‍ॅलिटी शोज व स्पर्धामधून चमकवले जाते नि भारतीय क्रिकेट मंडळांना पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळण्याचे सुचत आहे.
त्यामुळे रतन टाटांसारख्या मोजक्या देशाभिमान्यांचा अभिमान वाटतो नि आशेची पालवी फुलू लागते!
विजय देशपांडे, दादर.



प्रती भारत सरकार -

ठीक आहे तुम्ही पाकिस्तान वर हल्ला करू शकत नाही, त्यांच्या दहशतवादी तळ्यांवर हल्ला करू शकत नाही, तो छोटा देश आपण मोठा देश वगैरे वगैरे.......पण मग त्यांच्याशी संबंध तरी कशाला? तोडा आयात निर्यात त्यांच्याशी......नका क्रिकेट खेळू ना त्यांच्याशी........नको आपल्याला त्यांचे कलाकार जे लाखो डॉलर्स घेऊन हवाला करत फिरतात आपल्याच विमानतळांवरून आणि आपण सोडून देतो त्यांना लाच घेऊन........नको आपल्याला नसती कौतुके लैला खान आणि तिच्या संपत्तीची........नको मुशर्रफ सारख्या गद्दाराला ताज महालची सफर आणि वाजपेयींचा डिनर.......आणि हो या सगळ्यांच्या हिरोला पोसतोय उगीच आपण ज्याने आपल्याच ४०० लोकांना आपल्याच मातीवर येऊन ठार केलं........

जखमा खोल आहेत खूप....सहिष्णुता माणुसकी आमच्यात आहे ठासून भरलेली.....पण लाज नको वाटायला आपणच भारतीय असल्याची........अमेरिका कशीही असो त्यांचा स्वाभिमान नाही मेला......आपला मेलाय आणि आपल्या पुढच्या जनरेशन ला पण लाज वाटणारे या सगळ्या गोष्टींची.....वेळीच पावलं उचलावीत नाहीतर कुणीतरी घरात येऊन मारेल आपल्याला........बघा विचार करा.......नाहीतर उपोषण !!!!!!!

No comments:

Post a Comment

Followers