Thursday, August 1, 2019

मी पुढे जाणारच!!!!


मुंबईचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काये माहितीये ? रस्त्यावर गाड्या हाकणारी “बेअक्कल” माणसं. त्यात रिक्षावाल्यांचा पहिला, बाईक वाल्यांचा २रा आणि कार चालकांचा “सन्मानपूर्वक” ३रा नंबर लागतो.
सिग्नल ही एक “अफवा” आहे मुंबईत. तो पाळायचा वगैरे नसतोच; उलट सिग्नल वर आपल्याला पुढे कसं जाता येईल...याची चिंता जास्त करायची असते. तेव्हा तुम्ही सिग्नल पाळत असाल तर हा ब्लॉग बिलकुल वाचू नका. कारण सिग्नल पाळणारे “मूर्ख” असतात मुंबईत.

अशा शहरात अनेक माणसं फक्त Ambulance पोहोचू शकली नाही Hospital ला म्हणून नाहक मरतात. कारण इथे “लेन ड्रायविंग” कोणाला माहित नसतं. Ambulance आली की तिला साईड न देता आपण तिच्या मागून हाकायची गाडी, म्हणजे आपल्याला “फटाफट” पुढे सरकता येतं. अग्निशमन दलाच्या गाडीची भीती वाटते म्हणून साईड देतील कदाचित, पण Ambulance ला कधीच नाही. हे नक्कीच पाहिलंय मुंबईच्या रस्त्यावर.

पावसात खड्डे होतात म्हणून प्रशासनाला दोष द्यायचा. हो बरोबर आहे; पण आपलं पण कर्तव्य आहे न रोडवर जबाबदारीने गाडी चालवायचं? कशीही गाडी चालवून कसं चालेल ? चालतंय मुंबईत कारण सगळे मेलेत, सगळ्यांना फक्त पुढे जायचंय, फक्त “माझा” वेळ महत्वाचा बाकी लोकांचं नुकसान होवो नाहीतर ते मरोत. मी पुढे जाणारच!!!!

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खूप अपघात वाढलेत नै? का वाढलेत? हे जे हाय स्पीड वाले मूर्ख ड्रायवर आहेत त्यांच्यामुळे. माझ्या एका मित्राची गाडी एक्स्प्रेस वे वर ट्राफिक मध्ये उभी असताना मागून येवून एका ट्रक ने धडक दिली व त्याचा उजवा हात जखमी होवून कापावा लागला... असे अनेक अपघात रोज होतात. आपण दोष चुकीच्या माणसांना देतोय. प्रशासन काही करू शकत नाही. आपल्याला आपला स्पीड कंट्रोल करावा लागेल. पण यासाठी बुद्धी पाहिजे जी आपण गहाण ठेवलीये. माकडाच्या हातात एक मस्त गाडी आहे, फक्त त्याला ती जोरात हाकणे हेच जमतं.

कोणाला ऑफिसला जायचंय, कुणाला घरी, कुणाला अजून कुठेही, पण रस्त्यावर बाकीचे लोक आहेत याचा विसर पडलाय. फक्त मी आणि माझी गाडी. मग ट्राफिक लागलं तर मी wrong side ने जाणार कारण मला पुढे जायचंय; बाकी लोक गेले @#$%त;  ही आहे आजच्या मुंबईची गोष्ट.

आता थोडं प्रशासनाबद्दल पण – आमच्या लोकसभा मतदारसंघात “खासदार” साहेब निवडून आले. सगळ्या जगाने सोशल मिडिया वर account काढला म्हणून यांनी पण काढला. आता त्यावर रोज कुठल्यातरी उद्घाटन सोहळ्यांचे फोटो किंवा तेच ते “शुभेच्छुक” वाले फोटो टाकत असतात. मतांची भीक बरोबर मागता येते पण जनतेची हाक ऐकू येतच नाही.

त्यांना मी पत्र लिहिलं आणि Twitter वर टाकलं कारण साहेब कुठून भेटणार आम्हाला निवडणुकीशिवाय ? विषय होता आमच्या आरे रोडवर रस्ता दुभाजक टाकण्याचा !!!!
अहो का म्हणून काय विचारता ? एकदा या आरे रोडवर आणि बघा किती मस्त ४ लेनच्या रोडवर लोक ३ लेन आपल्या “बापाच्या” असल्याप्रमाणे वापरतात आणि वरून मस्त attitude पण देतात. एकदा या न अनुभवायला.....सकाळी १० वाजता या. ऐन गर्दीच्या वेळी मस्त डेमो मिळेल. कारण सिग्नल आहे, पोलीसही आहेत, पण रस्ता बापाचा आहे न आपल्या; हाका गाड्या !!!!! कोण विचारतोय? सो, खासदार साहेबांनी एक साधा रिप्लाय पण केला नाही त्या Tweet ला. असो.

ट्राफिक पोलिसाने आपलं काम नीट केलं तर मुंबईत “जाम” होणार नाही. पण नाही. त्यांचा collection day आल्याशिवाय ते नाही करत काम. त्यांना पगार मिळत नाही, पडक्या इमारतीत राहतात, त्यांना त्यांच्या पालकांनी जबरदस्ती ही नोकरी करायला लावलीये त्यामुळे ते स्वताचं काम नीट करत नाहीत. यात त्यांचा तरी काय दोष..... (कुठल्याही परिस्थितीत आपलं “काम” नीट करणारे फक्त भारतीय सेनेतले जवानच आहेत इथे)

सो, बेसिकली ही परिस्थिती कधीच सुधारणार नाही. कारण आपण जनता म्हणून सुधारणार नाही. कारण आपण लाल सिग्नल मानत नाही. दुसरा उभा राहिला की आपण हॉर्न वाजवून त्याला शिवी देतो. पोलिसाला चिरीमिरी देवून पुढे निघतो. पोलीस पण वरून आदेश आल्याशिवाय काम करत नाहीत. हे Vicious Circle आहे. कधीच न संपणारं !!!!

या सगळ्यात मी एकच ठरवलंय. मी सिग्नल पाळणार. माझ्या मागे उभे राहून कितीही हॉर्न वाजवा, मी हलणार नाही. सिग्नल हिरवा झाला की पुढे जाणार. काय करायचं ते करा. फक्त घरी कोणीतरी वाट पाहत असतात, तुमच्याही आणि माझ्याही; सो, गाडी चालवताना निदान स्वताचा नाही तरी दुसर्‍याचा जीव धोक्यात घालू नका !!!! अर्थात एवढं समजण्याची लोकांची कुवत असेल तरच.....


Friday, April 21, 2017

Blog Revamping - Fresh Start !!!!

Hey All, 

Thanks so much for your generous support & love towards my Marathi Blog,
http://bolkesur.blogspot.in/

I just thought that this is the best time to revive this blog of mine, where I can express my views on various current issues in English. 

This is the First post and as usual I am shy of a subject today; hence just writing this welcoming post. I really hope and think that you all will join in my reading list here too and we can share our thoughts together through this platform. 

Signing off now, as I am in a Prep session of my newly Opening Concert, "Suvarna Marathi" tomorrow. But will be back here soon with a subject and my views on it. 

Eager to get back to writing blogs in English. Already loving the thought of it. 
See you all Soon :) Love n God Bless. 

Thursday, February 11, 2016

श्रद्धा......सबुरी !!!!!!!!

आज मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करणार आहे. खाली एका विडिओची लिंक देतोय. तुमच्या सवडीने नक्की बघाच.

'आज विराट कोहलीने लेगला नीट फलंदाजी केली नाही ना?' असे जे चावडीवरच्या गप्पा आपण मारत असतो, तेच राजकारण म्हटलं की अजून तावातावाने बोलत सुटतो. आपल्याला रेफरन्स असतो तो आपल्या आजूबाजूला असलेल्या भ्रष्ट मीडियाच्या भीषण अस्त्रांचा. म्हणजेच टी.व्ही. किंवा रक्तरंजित वर्तमानपत्रे. पण आपण Facts तपासूनही पाहत नाही. किंवा सोप्पं म्हणजे आपल्याला माहीतच नसतात ते.

साधं "मत द्या" असं ओरडून / भिका मागून सांगायला लागतं वोटिंगच्या दिवशी आपल्याला; पण मत द्यायला आपण एका पायावर तयार.

आजकाल खूप ओरड ऐकतोय, "अच्छे दिन ? ? ? कुठेयत ? ? ? "
मोदीजी म्हणाले होते - सामान्य माणूस पिचतोय - Intolerance - वगैरे.....

गेली ६५ वर्ष ज्या घराण्याने / पक्षाने सत्ता उपभोगली, त्याचे पडसाद एका वर्षात पुसता कसे येतील ? त्याला वेळ लागणारच. जर झाडाच्या मुळांनाच कीड लागलेली असेल तर ते उपटून नवी रोपं लावायला लागतात आणि ती मोठी व्हायला वेळ लागतो.

काल हा इंटरव्यू पाहिला. आणि खूप समाधान वाटलं, की आज भारतात काही हुशार आणि प्रामाणिक लोक महत्वाच्या हुद्द्यांवर जबाबदारी सांभाळत आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या बद्दलची प्रचीती गोव्यात गेल्यावरच अनेकदा आली होती. पण त्यांचा अभ्यास आणि त्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी पाहून थक्क झालो. कुठल्याही डिफेन्स मिनिस्टर चा याआधी इतका परखड जबाब मी ऐकलेला नाही. त्यांचं KNOWLEDGE बघा. त्यांची विषयावरची पकड किती जबरदस्त आहे याचा खूप अभिमान वाटला.

त्यांच्याप्रमाणेच सध्या भारतीय रेल्वे चे माननीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांचंही कार्य सध्या जोरात आणि जोमात सुरु आहे. याची प्रचीती फक्त रेल्वे स्टेशन ला गेल्यावर येऊ शकते.

आजच्या म.टा. मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याही धोरणात्मक निर्णयाचं कौतुक करणारा लेख आलाय. असे अनेक नेते चांगलं काम करत आहेत. माननीय पंतप्रधानांनी नेमून दिलेली ही मंडळी आपापल्या पदांवर उत्तम काम करताहेत. याची प्रचीती येतेय. अजून ४ वर्षे आहेतच पुढे काय होतंय ते पहायला.

आपण फक्त patience ठेवला पाहिजे. आणि मिडियावर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवायची वेळ आलीये. कोण किती पैसे देऊन कुठली बातमी कुठे फिरवतो यापेक्षा मुळात field level वर काय काम चालू आहे ते पाहणं जास्त महत्वाचं आहे.

हा विडीयो पहा आणि आपण ज्यांना निवडून दिलय त्यांच्यावर समाधानाने विश्वास ठेवा......चांगले दिवस येणारच !!!!!!


https://www.youtube.com/watch?v=0vANeT930Bg

Monday, January 12, 2015

"थुकराट" जनता - सावधान !!!!!

Social Policing.....या विषयावर गेले काही दिवस विचार सुरु आहे. कसं करता येईल हे ?  कारण असं की, कार मधून येत जाता रस्त्यावर बिनबोभाट "थुंकणारे", "थुकराट" लोक दिसले कि तळपायाची आग मस्तकात जाते. असं वाटतं की उतरून सरळ एक मुस्काटात द्यावी अश्या लोकांच्या. ज्यांना "थुंकणे" ही क्रिया अत्यंत खाजगी असते याचीही जाण नसते, इतरांना याचा त्रास, घृणा वाटू शकते, असं एकदाही वाटत नाही, रस्ता आपल्या परम पूज्य पिताश्रींचा असल्यासारखे थुंकून पुढे निघून जातात. शिवाजी महाराजांच्या वेळी असते तर, जीभा छाटल्या असत्या महाराजांनी. हीच शिक्षा योग्य आहे, एकदा आयुष्यात मोठं नुकसान झाल्याशिवाय धडाच मिळत नाही.

बरं इथे कुठल्या एका स्तरातल्या लोकांच्या थुंकण्याविषयी बोलतंच नाहीये मी, मर्सिडीज मधुन जाणाऱ्या जातिवंत पांढरपेशी , शिकल्या सवरलेल्या , जेष्ठ नागरिकांनाही मी यथार्थ थुंकताना पाहिलंय. अर्थात आजकाल मर्सिडीज कोणीही घेऊ शकतो लायकी नसताना, त्यामुळे इथे मतभेद असू शकतात.

विचार चालू होता की,  या लोकांना शासन होईल असं काय बरं करता येईल?  मोदी सरांच्या "मन की बात" मध्ये, हा विषय मांडण्याची इच्छा पण झाली, पण त्या आधी, आपल्याला ग्राउंड लेवल वरती काय काम करता येईल हे सुचतच नव्हतं. त्यातच आजच्या पेपरला ही बातमी वाचली.



आणि मनापासून आनंद झालाय मला. हे व्हायलाच पाहिजे आता. ह्या मुजोर थुंकणाऱ्या लोकांना दंड सांगितला तर पैसे तोंडावर फेकून पुढे निघून जातील. त्यापेक्षा लायसन्स रद्द करणे ही चांगली शिक्षा आहे. वादच नाही. फक्त, आपल्या वाहतूक पोलिसांनी ह्याच्याकडे "लाच" किंवा "खिसा गरम" करून घेण्याचे नवीन साधन म्हणून न बघता, खरच याची चोख अंमलबजावणी केली पाहिजे. 

आपला, नागरिक म्हणून, यात सहभाग असला पाहिजे, म्हणजे काय तर, कोणी असा / अशी  थुंकत असेल तर त्याला बेजीझक जाऊन सांगणे की बाबारे, आता कायदा येतोय, थुंकू नकोस. आणि कायदा म्हणूनच नाही तर इतर लोकांच्या आरोग्याचा पण विचार कर, स्वच्छता अभियान आपल्यापासून सुरु होतं लेका. सो थुंकू नकोस. 

हे विधेयक येईल, किंवा नेहमीप्रमाणे, काहीही मुद्दे नसलेले विरोधक, याला विरोध करतील, मला दोन पाउले पुढे जाऊन असं वाटतं की, याच्याही पेक्षा कठोर आणि मानहानीकारक शिक्षा जर दिली, तर जरब बसेल या नतद्रष्ट लोकांवर. 

आपल्या देशात खिश्यात दमडी नसली तरी डोक्यात हवा आणि @#$% मध्ये माज पहिले असतो. "इज्जत" मोठी, बाकी सगळं नंतर, अश्या अविर्भावात फिरत असतात लोक. तेव्हा जो थुंकेल, त्याला उतरवून,  स्वत: त्याने केलेली घाण साफ करायला लावली पाहिजे, म्हणजे पुढच्या खेपेला तो एकदा तरी विचार करेल. 

आपल्याकडे श्रमदानाची लाज वाटते सगळ्यांना. सो, एखाद्या POSH गाडीतून उतरवून जेव्हा घाण साफ करायला सांगितलं जाईल तेव्हा सगळा "स्वाभिमान" एका क्षणात गळून पडेल यांचा. कारण काय आहे न, २०,००० रुपये पण पोलिसाच्या तोंडावर "दंड" म्हणून फेकून जाण्या इतपत पैसे आजकाल लोकांच्या खिश्यात असतात हो. त्यामुळे स्वत: केलेला कचरा, घाण, थुंकी स्वत: साफ केली तरच लाज वाटेल आपल्या कृत्याची. 

असो, आपण काही हिटलर नाही, पण आपल्याच देशवासीयांच्या कर्माने हे दिवस दिसतायत आज. तेव्हा देव करो आणि हे विधेयक लवकर पास होवो. मी ठरवलंय की मला यापुढे कोणीही थुंकताना दिसला तर, मी त्याला जाऊन सांगणार आहे की हे चुकीचं आहे. आता देतोय ती वाॅर्निंग आहे, नंतर कायदा ठासेल. लक्षात असुदेत. 

समाजाला चांगलं बनवायचं असेल तर आपणच पाहिलं पाउल उचललं पाहिजे. शेवटी,  सुरुआत आपल्यापासूनच होते ना !!!!




Tuesday, December 23, 2014

We The People !!!!

खूप दिवसांपासून लिहीन म्हणत होतो, पण वेळेअभावी जमत नव्हतं, आज सकाळी पेपर वाचताना प्रकर्षाने जाणवलं की आज लिहिलाच पाहिजे ब्लॉग. अनेक दिवस झाले एक विषय तरळतोय डोक्यात. आपलं सरकार - आपला देश आणि आपली भारतीय लोकं....

अजबच विषय म्हणावा लागेल, इतके दिवस आपल्याला हवं ते सरकार येण्यासाठी खूप प्रयत्न, कष्ट, प्रार्थना सुरु होत्या आपल्या सगळ्यांच्याच, आणि आता ते साध्य झाल्यानंतर, काही दिवसातच आपल्यातलेच लोक सरकारला कसं खाली खेचता येईल याच्याच मागे लागताना दिसतायत. केंद्रात भा.ज. पा. चं सरकार आलं. माननीय मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले. उभ्या भारताचं स्वप्न सत्यात उतरलं. त्यांचा कार्यकाळ ६ महिने झाला नसेल, ६५ वर्ष राज्य केलेले लोक हिशोब मागू लागले. किती दुर्दैवी आहे ही गोष्ट? ६५ वर्षे केलेला कचरा ६ महिन्यात कसा साफ होऊ शकतो ? 

ते राहिलं, माननीय मोदी साहेबांनी ज्या प्रकारच्या योजना आणि धोरणे अवलंबली आहेत त्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत यात शंका नाही. चीन सारख्या कपटी देशाला जेरीस आणण्यासाठी ऑस्ट्रलिया आणि जपान ची मनधरणी हा डाव पहिल्या काही दिवसात मोदिजींनी टाकून एक अतिशय मुत्सद्दी विचार पणाला लावला आहे. ह्या शिवाय चीनची कोंडी करणे भारताला शक्य होणार नाही. क्या बात है, असा विचार या आधी कधी झाला होता ? नेतृत्व बदलामुळे झालाय यात आपलं हित आहे. हे सगळ्यांना पटतंय. काही लोकांना मोदिजी परदेश वाऱ्या का करत आहेत असा प्रश्न पडलाय. असो. 

"स्वच्छ भारत अभियान", "मन की बात" असे एकाहून एक सरस उपक्रम हाती घेतलेत, आणि त्यांची अंमलबजावणी जातीने माननीय पंतप्रधान करत आहेत. ही विशेष अभिनंदनीय बाब वाटते मला. मन की बात तर एक अप्रतिम योजना आहे, ज्याद्वारे सामान्य जन पंतप्रधानांशी थेट संपर्क साधू शकतात. इतकी पारदर्शकता याआधी कधीच दिसली नव्हती राजकारणात. 








आता, स्वच्छ भारत अभियान म्हणजे फक्त रस्त्यावरचा कचरा साफ करणे नसून - प्रिय भारतीय जनहो, आपण स्वत: कुठेही कचरा न फेकणे म्हणजे पर्यायाने भारत स्वच्छ राहील असा आहे. रस्त्यावर येता जाता "थुंकणाऱ्या", "थुकराट" लोकांना कोण आणि कसं सांगणार हे अभियान म्हणजे काय आहे ते ? मतितार्थ हा की, सगळ्या गोष्टी सरकार करणार नाही, आपण सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टी कटाक्षाने पाळणे खूप महत्वाचे आहे. हे आपण कधी समजणार? किती वर्षे आपण सरकारला दोष देत राहणार फक्त? 

आता राज्यात पण त्यांचेच सरकार आले, Central Governance हे पंतप्रधानांचे उद्दिष्ट साध्य झाले, त्यासाठी अपार मेहेनत घ्यावी लागली अनेकांना आणि मगच हे फळ दिसलंय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत. इतक्या वर्षांनी, काहीतरी चांगले बदल आजूबाजूला घडतायत, विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होतंय, तेव्हा स्थानिक राजकारणासाठी काही लोकांनी आडवा पाय घातला, फार्स केला, राग रुसवे दाखवले, काही उपयोग झाला नाही त्याचा, शेवटी सत्तेच्या हव्यासामुळे सत्तेत सहभागी व्हावंच लागलं ना? मग राज्याचा विकास महात्वाचा असून आपले Egos कशाला मध्ये आणायचे? निवडणुकीआधी सुद्धा आणि नंतर सुद्धा. ज्याला मनापासून काम करायचं असतं तो काम करतो. नाटकं करत नाही. अतिशय अपरिपक्व राजकारणाचं उत्तम उदाहरण. आता सत्ता स्थापना झालीये. चांगल्या विकासासाठी एकत्र झटणे हीच परम इच्छा असली पाहिजे सगळ्यांची, बघू आता काय होतंय ते; पण आपण सगळ्यांनी Patience ठेवलाच पाहिजे. परिस्थिती सुधारेल. विश्वास हवा. 

केंद्रात उत्तम कारभार सुरु असताना, काही लोकांनी धर्माच्या वावड्या उठवायला सुरुवात केली आहे, अहो, यासाठी हे सरकार नाहीये. विकास आणि फक्त विकास यासाठी आहे. कुठेतरी भारतीय माणूस चांगले दिवस बघायची सुरुवात करायला लागला की यांना धर्म का सुचतो ? देवास ठाऊक. घातक आहे हा विचार. माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात असला पाहिजे. 
आजही आपल्याकडे या बद्दल जन प्रबोधन करण्यासाठी, "Oh My God" किंवा "PK" सारख्या कलाकृतींची निर्मिती करावी लागते. तरी लोक बोध घेत नाहीत. 





थोडक्यात, सामान्य जनांच्या इच्छेनुसार राज्यकर्ता निवडलेला आहे, राज्यकारभार व्यवस्थित सुरु आहे, नवीन बदल घडत आहेत, विकास आणि उन्नती काही वर्षात साधेल अशी हवा आहे, तेव्हा आपण सर्वांनी यात सकारात्मक हातभार लावला पाहिजे, नकारात्मक गोष्टी दूर ढकलून उद्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे सुबत्ता येईल. भारताला जगात महासत्ता बनायचे असेल तर भारतीय लोकांनी त्यासाठी स्वत: मध्ये बदल घडवून आपल्या देशाला मान मिळवून द्यावा लागेल. 

आज जे विचार मी मांडतोय ते केवळ भा.ज. पा. किंवा माननीय पंतप्रधान यांचा उदो उदो करण्यासाठी म्हणून नसून, आपल्या आजूबाजूला इतक्या काळानंतर काहीतरी बदलताना दिसतंय म्हणून लिहितोय. एवढ्या वर्षांच्या गलिच्छ राजकारणातून झालेल्या चिखलात उतरून कोणीतरी तो चिखल साफ करू पाह्तंय, हे खूप आशादायी चित्र आहे. शेवटी सिस्टीम मध्ये शिरून सिस्टीम बदलणं महत्वाचं आहे.  सध्याचं सरकार हे कार्य तडीस नेईलच, तेव्हा आपण सगळ्यांनी या कार्याला प्रतिसाद देऊन, आणि स्वत: पासून सुरुवात करून आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी काम केलं पाहिजे. 


Monday, November 24, 2014

Pal Pal dil ke paas

Reconnecting......

Reconnecting with my English Blog page after ages.
One has to be on the toes to be connected with Writing. Once you take a break, its very difficult to re-connect.

I remember I created this blog page in 2009, and shared some posts. After that I was not very regular here. Then I started another blog page, in Marathi, which was related to Music n me. Bolke Soor.

I suddenly remembered that this place I am holding is going empty. Nothing is happening here. So thought of writing back here again.

In this Blog space, I am going to put my thoughts generally here. Be it Music, Politics, Sports, Environment, GK, anything.

Originally this space was meant to be for the same. But......
Anyways, good to write some thoughts in English. Feeling truly Globalized. hehehe.

I take an oath to write at least a Post per week. I will.
Checking out now.....

:)


Followers