Social Policing.....या विषयावर गेले काही दिवस विचार सुरु आहे. कसं करता येईल हे ? कारण असं की, कार मधून येत जाता रस्त्यावर बिनबोभाट "थुंकणारे", "थुकराट" लोक दिसले कि तळपायाची आग मस्तकात जाते. असं वाटतं की उतरून सरळ एक मुस्काटात द्यावी अश्या लोकांच्या. ज्यांना "थुंकणे" ही क्रिया अत्यंत खाजगी असते याचीही जाण नसते, इतरांना याचा त्रास, घृणा वाटू शकते, असं एकदाही वाटत नाही, रस्ता आपल्या परम पूज्य पिताश्रींचा असल्यासारखे थुंकून पुढे निघून जातात. शिवाजी महाराजांच्या वेळी असते तर, जीभा छाटल्या असत्या महाराजांनी. हीच शिक्षा योग्य आहे, एकदा आयुष्यात मोठं नुकसान झाल्याशिवाय धडाच मिळत नाही.
बरं इथे कुठल्या एका स्तरातल्या लोकांच्या थुंकण्याविषयी बोलतंच नाहीये मी, मर्सिडीज मधुन जाणाऱ्या जातिवंत पांढरपेशी , शिकल्या सवरलेल्या , जेष्ठ नागरिकांनाही मी यथार्थ थुंकताना पाहिलंय. अर्थात आजकाल मर्सिडीज कोणीही घेऊ शकतो लायकी नसताना, त्यामुळे इथे मतभेद असू शकतात.
विचार चालू होता की, या लोकांना शासन होईल असं काय बरं करता येईल? मोदी सरांच्या "मन की बात" मध्ये, हा विषय मांडण्याची इच्छा पण झाली, पण त्या आधी, आपल्याला ग्राउंड लेवल वरती काय काम करता येईल हे सुचतच नव्हतं. त्यातच आजच्या पेपरला ही बातमी वाचली.
बरं इथे कुठल्या एका स्तरातल्या लोकांच्या थुंकण्याविषयी बोलतंच नाहीये मी, मर्सिडीज मधुन जाणाऱ्या जातिवंत पांढरपेशी , शिकल्या सवरलेल्या , जेष्ठ नागरिकांनाही मी यथार्थ थुंकताना पाहिलंय. अर्थात आजकाल मर्सिडीज कोणीही घेऊ शकतो लायकी नसताना, त्यामुळे इथे मतभेद असू शकतात.
विचार चालू होता की, या लोकांना शासन होईल असं काय बरं करता येईल? मोदी सरांच्या "मन की बात" मध्ये, हा विषय मांडण्याची इच्छा पण झाली, पण त्या आधी, आपल्याला ग्राउंड लेवल वरती काय काम करता येईल हे सुचतच नव्हतं. त्यातच आजच्या पेपरला ही बातमी वाचली.
आणि मनापासून आनंद झालाय मला. हे व्हायलाच पाहिजे आता. ह्या मुजोर थुंकणाऱ्या लोकांना दंड सांगितला तर पैसे तोंडावर फेकून पुढे निघून जातील. त्यापेक्षा लायसन्स रद्द करणे ही चांगली शिक्षा आहे. वादच नाही. फक्त, आपल्या वाहतूक पोलिसांनी ह्याच्याकडे "लाच" किंवा "खिसा गरम" करून घेण्याचे नवीन साधन म्हणून न बघता, खरच याची चोख अंमलबजावणी केली पाहिजे.
आपला, नागरिक म्हणून, यात सहभाग असला पाहिजे, म्हणजे काय तर, कोणी असा / अशी थुंकत असेल तर त्याला बेजीझक जाऊन सांगणे की बाबारे, आता कायदा येतोय, थुंकू नकोस. आणि कायदा म्हणूनच नाही तर इतर लोकांच्या आरोग्याचा पण विचार कर, स्वच्छता अभियान आपल्यापासून सुरु होतं लेका. सो थुंकू नकोस.
हे विधेयक येईल, किंवा नेहमीप्रमाणे, काहीही मुद्दे नसलेले विरोधक, याला विरोध करतील, मला दोन पाउले पुढे जाऊन असं वाटतं की, याच्याही पेक्षा कठोर आणि मानहानीकारक शिक्षा जर दिली, तर जरब बसेल या नतद्रष्ट लोकांवर.
आपल्या देशात खिश्यात दमडी नसली तरी डोक्यात हवा आणि @#$% मध्ये माज पहिले असतो. "इज्जत" मोठी, बाकी सगळं नंतर, अश्या अविर्भावात फिरत असतात लोक. तेव्हा जो थुंकेल, त्याला उतरवून, स्वत: त्याने केलेली घाण साफ करायला लावली पाहिजे, म्हणजे पुढच्या खेपेला तो एकदा तरी विचार करेल.
आपल्याकडे श्रमदानाची लाज वाटते सगळ्यांना. सो, एखाद्या POSH गाडीतून उतरवून जेव्हा घाण साफ करायला सांगितलं जाईल तेव्हा सगळा "स्वाभिमान" एका क्षणात गळून पडेल यांचा. कारण काय आहे न, २०,००० रुपये पण पोलिसाच्या तोंडावर "दंड" म्हणून फेकून जाण्या इतपत पैसे आजकाल लोकांच्या खिश्यात असतात हो. त्यामुळे स्वत: केलेला कचरा, घाण, थुंकी स्वत: साफ केली तरच लाज वाटेल आपल्या कृत्याची.
असो, आपण काही हिटलर नाही, पण आपल्याच देशवासीयांच्या कर्माने हे दिवस दिसतायत आज. तेव्हा देव करो आणि हे विधेयक लवकर पास होवो. मी ठरवलंय की मला यापुढे कोणीही थुंकताना दिसला तर, मी त्याला जाऊन सांगणार आहे की हे चुकीचं आहे. आता देतोय ती वाॅर्निंग आहे, नंतर कायदा ठासेल. लक्षात असुदेत.
समाजाला चांगलं बनवायचं असेल तर आपणच पाहिलं पाउल उचललं पाहिजे. शेवटी, सुरुआत आपल्यापासूनच होते ना !!!!

No comments:
Post a Comment